।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांची प्रश्नावली

प्रश्नावलीसंबंधी खुलासा

श्री महाराजांनी तयार केलेली प्रश्नावली लोकोपकारार्थ एका प्रसिद्धीनिरपेक्ष सज्जन गृहस्थांनी दिली. ती येथे प्रसिद्ध केली आहे. ही पहाण्याची पद्धती पुढीलप्रमाणे आहे.
मनातील कामना पूर्ण होण्याकरिता पुढीलप्रमाणे करावे. आपण श्री क्षेत्र माणगांव मधील श्री. प. प. टेंब्ये स्वामींनी स्थापन केलेल्या श्री दत्तमंदिरात श्री दत्तमहाराजांच्या समोर उभे आहोत असे मनात आणावे. त्यानंतर आपला कुलस्वामी, कुलस्वामिनी, आराध्यदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, पूर्वज व  सदगुरुंची प्रार्थना करुन आपला प्रश्न श्री दत्त महाराजांना सांगून वरील सर्व देवतांचे पुन्हा एकदा स्मरण करुन या प्रश्नावलीतील कोणत्याही एका अक्षरावर  बोट ठेवावे. नंतर ज्या अक्षरावर बोट ठेविले असेल त्याच्या पुढील अक्षरापासून अक्षरे मोजण्यास आरंभ करावा. असे मोजताना प्रत्येक अठरावे अक्षर एका कागदावर लिहून ठेवावे. याप्रमाणे प्रथम ज्या अक्षरावर बोट ठेविले असेल त्या अक्षरापर्यंत अठरा अठरा अक्षरे मोजावीत व प्रत्येक अठरावे अक्षर क्रमाने एका कागदावर मांडून ठेवावे. या अठराव्या अक्षरांचा मिळून एक मराठी श्लोक तयार होतो व त्यात दत्तमहात्म्य वाचावे, कृष्णालहरी वाचावी, पंचपदी करावी, करुणात्रिपदी म्हणावी. इत्यादी रुपाने कामना पूर्ण होण्याकरिता काही साधन सांगितले जाते. श्रद्धापूर्वक त्याप्रमाणे वाचून सर्वांनी आपली इष्टसिद्धी सदगुरुकृपेने करुन घ्यावी.
या ठिकाणी प्रश्नावलीसाठी मार्गिका दिलेली आहे. येथे गेल्यावर वरील सर्व गोष्टी मनात स्मरण करुन प्रश्नावलीतील एका अक्षरावर क्लिक करावे. त्यानंतर आपोआप त्या अक्षरापासून तयार होणारा श्लोक दिसेल. तसेच त्यामधील येणारा मंत्र / श्लोक / ग्रंथ / पूजाविधी असे दिसेल. त्या ठिकाणी क्लिक केल्यावर तो मंत्र / श्लोक / ग्रंथ / पूजाविधी पी.डी.एफ. प्रकारामध्ये समोर दिसेल.

 

सूचित साधन

प्रश्नावली

( प्रत्येक अठराव्या अक्षरापासून तयार होणारे
१८ श्लोक व अर्थ – त्यासाठी येथून क्लिक करावे. ) 

( येथून क्लिक करावे. )    

 

।। अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।।

<