।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

 

बहुवर्षिय धार्मिक विधी

 

१ एप्रिल २०१२ पासून सुरु होणा-या योजना खालीलप्रमाणे

 

अष्टदशवर्षिय शाश्वतपूजा योजना रु.१००१ श्रीं चे जन्मस्थानी एकावर्तन अभिषेक व संकल्पानुसार श्रीं चे चरणी प्रार्थना. वर्षातून एक वेळा असे सलग १८ वर्षे प्रसाद पाठविला जाईल. यजमान निवर्तल्यास अभिषेक बंद होईल.
अष्टदशवर्षिय अन्नदान योजना रु.२००१ श्री दत्त मंदिरात  अन्नदान व संकल्पानुसार श्रीं चे चरणी प्रार्थना. अन्नदान होऊन प्रसाद वर्षातून एक वेळा असे सलग १८ वर्षे प्रसाद पाठविला जाईल.
अष्टदशवर्षिय उत्सव अन्नदान योजना रु.२५०१ श्री दत्त मंदिरात  अन्नदान व संकल्पानुसार श्रीं चे चरणी प्रार्थना. येथे होणा-या उत्सवांपैकी भक्तांनी निवडलेल्या उत्सवापैकी एका उत्सवाला अन्नदान होऊन प्रसाद वर्षातून एक वेळा असे सलग १८ वर्षे प्रसाद पाठविला जाईल.
अष्टदशवर्षिय बृहत अन्नदान योजना रु.२५००१ व त्यापुढे श्री दत्त मंदिरात  अन्नदान व संकल्पानुसार अभिषेक व विनाशुल्क अन्नदान होईल. प्रसाद सलग १८ वर्षे पाठविला जाईल. यजमान निवर्तल्यास अभिषेक बंद पण अन्नदान सुरु राहील.
पंचविंशतीवर्षिय अन्नदान योजना रु.५१००१ व त्यापुढे श्री दत्त मंदिरात  अन्नदान व संकल्पानुसार अभिषेक व विनाशुल्क अन्नदान होईल. प्रसाद सलग २५ वर्षे पाठविला जाईल. यजमान निवर्तल्यास अभिषेक बंद पण अन्नदान सुरु राहील.
एकपंचदशवर्षिय अन्नदान योजना रु.१००००१ व त्यापुढे श्री दत्त मंदिरात  अन्नदान व संकल्पानुसार अभिषेक व विनाशुल्क अन्नदान होईल. प्रसाद सलग ५१ वर्षे पाठविला जाईल. यजमान निवर्तल्यास अभिषेक बंद

 

विनंती

 

१.पत्ता बदल झाल्यास  किंवा यजमान  निवर्तल्यास भक्तांनी कृपया कार्यालयाला लेखी कळवावे.
२. शाश्वत पुजा व शाश्वत अन्नदान या योजनेमध्ये ३१ मार्च २०१२ पर्यंतच देणगी देवू शकता.
३. नवीन योजना १ एप्रिल २०१२ पासून पुढे चालू राहतील.
४. पूर्वीच्या योजना जशा आहेत तशाच सुरु राहणार आहेत.
५. एखाद्यावेळी काही कारणानाने प्रसाद पावती परत आल्यास पुन्हा प्रसाद पाठविला जात नाही, मात्र धार्मिक विधी होतात.त्यामुळे भक्तांना प्रसाद मिळत नाही अशा भक्तांनी कृपया आपला पावती नंबर किंवा  विधी दिन या सह संपर्क साधावा.

 

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।