।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

 

श्री क्षेत्र माणगांव येथील
१. श्री दत्त मंदिर आणि २. श्री. प. प. टेंब्ये स्वामींचे जन्मस्थान
या दोन्ही स्थानांपैकी भक्तांच्या इच्छेनुसार कोणत्याही एका स्थानी खालील धार्मिक पूजा विधी होतात.

 

धार्मिक पूजा विधी

 

खालील धार्मिक पूजाविधींना यजमान स्वतः उपस्थित राहू शकतात. यजमानांना उपस्थित राहणे शक्य नसल्यास पुजा-यांकरवी विधी करुन घेतला जातो. यजमानांच्या विनंतीनुसार प्रसाद पोष्टाने घरी पाठविला जातो.(केवळ भारतात)

 

धार्मिक सेवा

सेवा मूल्य

सेवेची तपशीलवार माहिती

अभिषेक पूजा

रु. ५१

कोणत्याही एका स्थानावरील पादुकांवर एक आवर्तन करतात.

एकादशिणी

रु. १०१

कोणत्याही एका स्थानावरील  पादुकांवर ११ आवर्तने केली जातात.

महापूजा

रु.  १५१

कोणत्याही एका स्थानावरील पादुकांवर अभिषेक, पंचामृतस्नान, नैवेद्य, षोडशोपचारपूजा, महानैवेद्य, इ. उपचार केले जातात.

पादुकापूजन

रु. ३५१

श्रीं चे जन्मस्थानी  पादुकांवर अभिषेक, पंचामृतस्नान, षोडशोपचारपूजा, नैवेद्य,  इ. उपचार केले जातात.   

श्री सत्यदत्तपूजा

रु. ५०१

श्रीं चे प्रश्नावली सेवेतून आलेली सेवा  श्रीं चे जन्मस्थानी  केली जाते. ही पूजा श्रीसत्यनारायण पूजेसारखीच असून पौर्णिमेला होते.

लघुरुद्राभिषेक

रु. १५००

महिम्न किंवा रुद्राच्या ११ एकादशिण्या म्हणजे एक लघुरुद्र. कोणत्याही एका स्थानावर भक्ताच्या इच्छेनुसार कुठच्याही एका उपलब्ध व शुभ दिवशी लघुरुद्र केला जातो. भक्तांकरवी संकल्प करुन घेतला जातो.

लघुरुद्राभिषेक सांगतेसह

रु. २०००

कोणत्याही एका स्थानावर भक्ताच्या इच्छेनुसार कुठच्याही एका उपलब्ध व शुभ दिवशी लघुरुद्र केला जातो. ११ एकादशिण्या म्हणजे एक लघुरुद्र. भक्तांकरवी संकल्प करुन घेतला जातो. ब्राह्मण सुहासिनी भोजनासह समाराधना केली जाते.

 

अभिषेक व महापूजा व्यतिरिक्त अन्य पूजा विधी उपलब्ध वेळेनुसार होतील.
त्यासाठी किमान ८ दिवस अगोदर कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।