।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

श्री दत्तक्षेत्रे

                    हे श्री दत्त मंदिर माणगांवचे अधिकृत संकेतस्थळ असुन प्रामुख्याने श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज स्थापित श्री दत्त मंदिर व श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांचे  जन्मस्थान व त्यांच्या कार्यासाठी समर्पित आहे. तसेच  त्यांच्या अनुषंगाने येणा-यांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
                    भक्तांना श्री दत्तसंप्रदायातील प्रमुख देवता , मनुष्यरुपी अवतारांची अल्प माहिती व विविध तीर्थक्षेत्रे यांची एकत्रित थोडक्यात माहिती उपलब्ध करुन देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. तसेच अधिक माहितीसाठी  ज्या स्थानांची अधिकृत संकेतस्थळे आहेत, त्यांची लिंक येथूनच देत आहोत. तसेच श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांचे समकालीन असलेले श्री. गजानन महाराज, शेगांव व श्री. साईबाबा, शिर्डी येथील संस्थानांच्या संकेतस्थळाची लिंक देखील देत आहोत.
                     तसेच श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांचे शिष्यवर्गापैंकी ज्या संस्थानांची  संकेतस्थळे आहेत, त्या संकेतस्थळांच्या लिंक देखील येथूनच देत आहोत.
श्री दत्तसंप्रदाय, मनुष्यरुपी दत्तावतार  व श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांचे समकालीन संत व श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांचे शिष्य यांची एकत्रित थोडक्यात माहिती व त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळांतच्या लिंकस एकत्रित देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
                      या स्थानांच्या माहितीत काही विशेष माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावयाची इच्छा असल्यास कृपया कार्यालयाला लिखित स्वरुपात पाठवून द्यावी. योग्य ती माहिती योग्य त्या शब्दात आम्ही संकेतस्थळावर प्रसिध्द करु.

 

                     वरील श्री दत्तस्थाना व्यतिरिक्त १ ) श्री क्षेत्र कडगंची ( संकेतस्थळ ) २) श्री क्षेत्र मंथन गड (मंथन गुडी) ३) श्री दत्त भोजन पात्र मंदिर, ४) श्री दत्त भिक्षा लिंग मंदिर,कोल्हापूर ( महाराष्ट्र ) ही श्री दत्तक्षेत्रे सुद्धा तितकीच महत्त्वाची आणि वंदनीय आहेत. श्री श्रीपाद वल्लभ स्वामी आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या पदस्पर्शाने हे क्षेत्र पुनित झालेली आहेत. त्यामुळे भक्तांनी या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे.

                     श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांचे समकालीन असलेले
                     श्री. गजानन महाराज, शेगांव   ( संकेतस्थळ )
                     श्री. साईबाबा, शिर्डी ( संकेतस्थळ )
                     श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांचे शिष्यवर्गापैंकी ज्या संस्थानांची  संकेतस्थळे आहेत, त्या संकेतस्थळांच्या लिंक देखील येथूनच देत आहोत.
                     श्री. प. पू. ब्र. रंगावधूत स्वामी महाराज ( श्री क्षेत्र नारेश्र्वर, गुजरात )
                     श्री. प. पू. नाना महाराज तराणेकर ( श्री क्षेत्र इंदौर, मध्यप्रदेश )
                     श्री. प. पू. वामनरावजी गुळवणी महाराज ( श्री क्षेत्र कुडुत्री, राधानगरी महाराष्ट्र )
                     डॉ. श्री. वासुदेव व्यंकटेश देशमुख, पुणे यांनी विशेष परिश्रम घेऊन श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे चरित्र व समग्र वाङमय ( स्तोत्रे, ग्रंथ, आरत्या, इ. ) हे संगणकीकृत करण्यात यशस्वी झाले आहेत. या संकेतस्थळावरुन आम्ही प्रश्नावली व विविध स्तोत्रे याकरिता तेथून लिंक घेतली आहे. त्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे.
                    सर्व भक्तांना  श्री. प. प. टेंब्ये स्वामींचे समग्र चरित्र व वाङमय वाचनासाठी व डाऊनलोड करण्यासाठी  त्यांनी तयार केलेल्या संकेतस्थळाची लिंक येथून देत आहेत. http://www.shrivasudevanandsaraswati.com