• १८५४ – माणगांव, सावंतवाडी : जन्म
    आनंदनाम संवत्सर, रविवार, श्रावण कृष्ण पंचमी दुपारी ४-४५ वाजण्याच्या सुमारास. (१३ ऑगस्ट १९५४)
  • १८५५ – माणगांव
    हरिभटांचा, आजोबांचा बालकास लळा व सहवास, चालावयास शिकवणे.. “आई बाबा, आजोब्बा” बोल.
  • १८५६ – माणगांव : चूडाकरण विधी
    तीन वर्षे पूर्ण होता चूडाकरण विधी. केस उतरवून शिखा राखली. त्याच वर्षी “ श्री गणेशाय नमः। ”, “ ओम् नमःसिद्धम्” ची धुळाक्षरे.
  • १८५७ – माणगांव : यक्षिणीच्या देवळात मुलांच्या शाळेत दाखल.
  • १८५८ – माणगांव : धारणाशक्ती उत्तम.
    दिलेला धडा आत्मसात करण्यास वेळ लागत नसे. वर्षभरात, मुळाक्षरे, बाराखड्या पूर्ण. पाढे, पावकी, निमकी औटकी, अकरकी पूर्ण.
  • १८५९ – माणगांव
    श्रींचे अक्षर अतिशय वळणदार, घरात वेदमंत्रांचा घोष. आजोबा हरिभट देवतांचे अर्चन, शास्त्रीय नियमांचे कठोर पालन करणारे. वडील गणेशपंत दत्तध्यानात मग्न. माता पतीसेवेत मग्न. पवित्र वातावरण.
  • १८६० – माणगांव
    पाच वर्षे पूर्ण होता शास्त्रशुद्ध संस्कृत शिक्षण सुरु. समासचक्र, शब्दरुपावली, अमरकोश, अष्टाध्यायी, नित्यनेम स्तोत्रे आजोबा हरिभटांनी शिकवण्यास सुरवात.
  • १८६१ – माणगांव : धारणाशक्ती प्रचंड कुशाग्रबुद्धी
    एकपाठी संस्कृतचा पाया दृढ झाला, उपग्रंथाची सुरुवात केली, शास्त्राध्यायन, स्वाध्याय चिंतनात खेळण्याच्या वयात रमून गेले. पाचव्या सहाव्या वर्षीच अंतर्मुख, प्रौढ, गंभीर.
  • १८६२ – माणगांव : मौजीबंधन
    सातवर्षे पूर्ण होताच, वेदशास्त्र अध्ययनास सुरुवात.
    भास्करभट ओळकर – ऋग्वेदाची संथा – कारण ऋग्वेदातील शाकल शाखेचे ब्राह्मण. भास्करभटाचा गृहत्याग.
  • १८६३ – माणगांव : अध्ययन
    भटवाडीतील वे.शा. सं.विष्णुभट तात्या उकिडव्यांकडे ऋग्वेदाची संथा. दहाव्या वर्षी आजोबांचे छत्र हरपले. घराची जबाबदारी लहानग्या वासुदेवावर.
  • १८६४ – माणगांव
    वेदाभ्यासो हि विप्रस्य तपः परमिहोच्यते या उक्तीची पूर्ण जाणीव ठेवून ध्यासपूर्वक वेदाच्या अभ्यासात याही वयात कष्ट. तप सुरु होते. त्यात घराचा भारही. वृत्ती गंभीर.
  • १८६५ – माणगांव : लग्नाचे पौरोहित्य, वय वर्षे ११.
  • १८६६ – माणगांव
    श्री उकिडवेशास्त्र्यांकडील वेदाध्ययनाचा व याज्ञिकाचा अभ्यास पूर्ण. श्री शंभूशास्त्री साधल्यांकडे संस्कृत, ज्योतिष अल्प शिक्षण. १२ व्या वर्षी ऋग्वेदसंहिता शिकून दशग्रंथी ब्राह्मण.
  • १८६७ – माणगांव
    त्रिकाल स्नान संध्या. श्रीगुरुचरित्र वाचन, देवतार्चन, पादुकापूजन पंचायतनपूजन दैनंदिन कार्यक्रम, आचार धर्म बालवयातही काटेकोर, प्रातर्होम अग्निपूजा. एकादशी व्रत कडक, जाग्रण द्वादशीही व्रतस्थ, गृहप्रपंच्यासाठी पौरोहित्य कर्म सुरु. परान्न संकट.
  • १८६८ – माणगांव
    श्रीगुरुचरित्रावर निष्ठा. “तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते” वचनावर निष्ठा धारणा. वादविवादापासून दूर.
  • १८६९ – माणगांव
    नेसावयास एक पंचा, एक उत्तरीय पांघरण्यासाठी. वाहनाचा व छत्रीचा वापर कधी केला नाही. अनवाणी चालणे. रात्री गवताच्या चटईवर शयन. ज्योतिषशास्त्र वैद्यक शास्त्रात विशेष प्रगती. १५ व्या वर्षी विद्यादान सुरु केले.
  • १८७० – माणगांव
    शास्त्री मंडळींच्या आदराला पात्र, कळत नकळत असाधारण गोष्टी हातून घडत. या ना त्या कारणाने लोकांच्या उपयोगी. मंत्रशक्तीची जाणीव.
  • १८७१-७४ – माणगांव
    मातोश्री व भावंडांची जबाबदारी, संसाराचा भार सांभाळणे, भावांच्या मुंजी, बहिणींची कार्ये. भिक्षुकीची कमाई.
  • १८७५ – माणगांव
    गोडे हवालदारांच्या कन्येशी, बायोशी विवाह, स्मार्ताग्नि उपासना, गायत्री पुरश्चरण.
  • १८७६ – गोवा
    धनार्जनासाठी श्री. पधे शास्त्र्यांकडे ज्योतिष्याचा अभ्यास.
  • १८७७ – माणगांव
    भाद्रपद कृष्ण द्वितिया- पिता गणेशपंतांचे निधन. ( प. प. स्वामी महाराजांचे वय २३ वर्षे )
  • १८७८ – ८२
    नासिक देव मामलेदारांची भेट.
    माणगांव, गृहकलह सुरु, मानसिक ताण, विरक्ती सावंतवाडीला जाणे.
    वैद्य आळवणीशी मैत्री. अणावकरांच्या समंधाचा परिचय. योगाची साधना, वाडीत यतीवेषधारी श्रीमन्नृसिंहसरस्वतींची मंदिराच्या दक्षिणव्दारी भेट.
  • १८८३ – सावंतवाडी : श्रीदत्तगुरुंचा स्वप्नात मंत्रोपदेश.
    कागलमार्गे येताना येथील व्यक्तीने दिलेली श्रीदत्त मूर्ती माणगावी आणून माणगाव येथेच सात दिवसांत श्रीदत्तमंदिराची निर्मिती. ( वैशाख शुद्ध ५ शके १८०५ )
  • १८८४-१८८८ – माणगांव
    माणगावातील सप्तवर्षांचा कालावधी सुरु. उत्सवमुर्ती व प्रवासी लहान दत्तमुर्तीची निर्मिती, प्रवासात अनेक उत्सव, भक्तांची दाटी. माणगाव भुवैंकुंठ होई.
  • १८८९
    द्विसाहस्री ग्रंथाची निर्मिती. माडीत श्रीदत्तप्रेमाची नव्हाळी चाखायला मिळे.
    पादुकांवरिल जलाभिषेक पुजार्यांची फजिती.
    माणगावात जयमायामय कायत्रपर यतिवर्या या आरतीची रचना. या आरतीत चार महावाक्यांचा आशय.
    माणगावचे सप्तवर्षांचे आज्ञाकार्य संपवुन माणगावाचा कायमचा त्याग. वाडीस आगमन. ( प.प.स्वामी महाराजांचे वय ३५ वर्षे )
  • १८९० – नरसोबाची वाडी
    ब्रम्हानंद मठात अन्नपुर्णा मातेसह वास्तव्य. गोखल्यांच्या ओवरीत पुत्रजन्म आणि पुत्रवियोग.
    दीक्षित स्वामींची भेट.
  • १८९१
    गोविंदस्वामींचे निर्वाण – श्रींचे सौ. अन्नपुर्णामातेसह प्रस्थान.
    कोल्हापुर, भिलवडी, औदुंबर, पंढरपुर, बार्शीमार्गे गंगाखेडला आगमन.
    शके १८१३ वैशाख वद्य चतुर्दशी शुक्रवार सौ.अन्नपुर्णामातेचे निर्वाण. चौदाव्या दिवशी ( प.प.स्वामी महाराजांचे वय ३७ वर्षे )
    श्रींचे संन्यासग्रहण. ( ज्येष्ठ शुद्ध १३ )
    महत्पुर – सारंगपूर – बजरंगगड – पिछौरा – खरेरा – जालवण – मार्गे दंडासाठी दत्ताज्ञेने उज्जयिनिला गमन.
    प.प. कैवल्याश्रम स्वामींची भेट.
    उज्जयिनीला प.प. श्री नारायणानंदसरस्वती हस्ते दंड ग्रहण.
    पहिला चातुर्मास उज्जयिनीस.
  • १८९२ – ब्रम्हावर्त
    दुसरा चातुर्मास श्रीदत्तपुराणाची रचना. ( प.प.स्वामी महाराजांचे वय ३८ वर्षे )
  • १८९३ – हरिद्वार
    तिसरा चातुर्मास – शारदापीठाधीश श्री शंकराचार्यांची भेट.
  • १८९४-१८९५ – हिमालयातील प्रवास.
    बदरीनारायणाची यात्रा व नरनारायणाची भेट,बद्रिकेदारादी हिमालयीन तीर्थक्षेत्रांनाभेटी.
    दोन वर्षांचा काल अज्ञात. चवथा आणि पाचवा चातुर्मास हिमालयात अज्ञातवासात.
  • १८९६ – हरिद्वार
    सहावा चातुर्मास करुन ब्रम्हावर्त – महत्पूर – ब्रम्हाणी मार्गे गंगाष्टकम श्रीगंगातीर्थ स्त्रोत्रम – श्री नर्मदा लहरीचे लेखन.
    ओम् कारेश्वर – मंडलेश्वर – महेश्वर मार्गे.
  • १८९७ – पेटलाद
    सातवा चातुर्मास श्रीदत्तलीलामृताब्धिसार या प्राकृत ग्रंथाची रचना.
    श्रीदत्तप्रभुंचा अभ्यंगस्नानाचा हट्ट चिखलदा येथे, पुर्ण केला.
  • १८९८ – चिखलदा
    चातुर्मासापुर्वी दोन महिने आगमन. प्लेगची साथ
    रेवाखंडावरपुराण व तेलगु लिपीतील कुर्मपुराणाचे देवनागरीत लिप्यंतर.
    चातुर्मास – समाप्तीनंतर मणिनागे श्र्वर – कुढेश्वर – गंगानाथ महादेव – कर्णाळी – चांदोद – व्यास –शुक्रमुनि करुन बरकाळच्या अत्री आश्रमांत आगमन. अनुसुयास्तोत्राची निर्मिती.
    गिरनार – प्रभास पट्टण – सोरटिसोमनाथ – प्राचीश्रेत्र – पोरबंदर करुन तिलकवाडा – आठवा चातुर्मास.
    संग्रहणीचा अती त्रास.
    शिनोर- श्रीरामचंमद्रशास्त्री प्रकाशकरांची भेट. गांडाबुवांची भेट.
    गिरनार यात्रा.
  • १८९९ – श्री क्षेत्र द्वारका
    नववा चातुर्मास – ग्रंथ जवळ नसताना प्रभास क्षेत्री आरंभ केलेली द्विसाहस्त्रीवरील टीका व चुर्णिका.
    राजकोट –बढवाण – विरमगाव मार्गे सिद्धपुर (मातृगया) हाटकेश्वर मंदिरांत दत्तजयंती. डाकोरमार्गे शिनोर, जागलावार कृपा. ज्येष्ठांच्या आरंभी.
  • १९०० – चिखलदा
    दहावा चातुर्मास- “माघमाहात्म्य” रचना इंदूरात १८ दिवस गायत्रीभाष्याचा पाठ. दंडगुरुंच्या आजारात सेवा.
  • १९०१ – महत्पूर
    अकरावा चातुर्मास – श्री दत्तपुराणाचा प्राकृत अवतार “श्री दत्तमहात्म्य” “त्रिशति गुरुचरित्र” ची रचना.
    डॉ. विश्वनाथ ताटके यांची हाड्याव्रण ( कर्क रोग ) मुक्तता.
    सखाराम कानडकरांच्या गळ्यावर उपचार.
    गांडाबुवांचे खेचरी मुद्रेसाठी जिव्हा छेदन डॉ. ताटके यांचे करवी करुन त्यांची खेचरी मुद्रेसाठी सिध्दता केली.
    तेथून सारंगपूरमार्गे भेलसा येथे श्री. गोविंद पंडीत यांना योगाचे शिक्षण. तेथून जालवण मार्गे चैत्रात ……..
  • १९०२-१९०३ – ब्रम्हावर्त
    तिस-यांदा आगमन. अडीच वर्षे मुक्काम – बारावा, तेरावा, चौदावा चातुर्मास.
    बाराव्या चातुर्मासाच्या काळात- प्रकृतीत बिघाड, शिरोळच्या श्री. शंकरराव कुलकर्ण्यांची भेट.
    अनेकांना किर्तनाचे धडे. ऑंधीतून शंकरराव कुलकर्णी आणि सीतारामबुवांची सुटका.
    बंधू सीतारामबुवांचे गायत्री पुरश्चरण, सगुण उपासनेचे महत्त्व स्पष्ट केले.
    प्लेगाचा फैलाव. श्रीं ना प्लेगचा प्रादुर्भाव आणि मुक्तता.
    श्री गुरुचरित्राचे संस्कृत भाषांतर म्हणजेच “समश्लोकी गुरुचरित्र”, हे भाषांतर फक्त पंचेचाळीस दिवसात केले.
    सात भजन मंत्राचे सप्ताह.
    तेरावा चातुर्मास- काशीच्या शांताश्रम स्वामींची भेट, वास्तव्य.
    ‘श्री सप्तशती गुरुचरित्रसार’ प्राकृताता रचना ( संपूर्ण श्री गुरुचरित्र मराठीमध्ये सातशे ओव्यांत निर्मित केले. )
  • १९०४ – ब्रम्हावर्त
    चौदावा चातुर्मास. श्रीं चे मौनव्रत.
    काल्पी जालवण, पिछोरा, भेलसा केले. भेलसा येथे श्री दीक्षितस्वामींची भेट. पुन्हा वाडीस. दीक्षितांचा दंडग्रहन विधी. वेदपाठशाळेची स्थापना पुजा-यांसाठी आचारसंहिता तयार.
    ‘स्नपनविधी’ थांबविला. ४८ दिवस मुक्काम. मिरजेच्या कृष्णा घाटावरुन पंढरपूर, अक्कलकोट मार्गे गाणगापूर.
    श्रीकृष्णामाईचे ‘श्रीकृष्णालहरी’ ५१ श्लोकाच्या स्तोत्राची रचना.
    संगमावर तुकाराम नावाच्या भक्तासाठी ‘श्री गुरुस्तुती’ स्तोत्राची रचना.
    हुमणाबाद मार्गे गंगाखेड,परळी वैजनाथ, माहूर औंढ्यानागनाथ, येवले, हिंगोली पांगरी मार्गे प्रस्थान.
  • १९०५ – नरसी
    पंधरा चातुर्मास ‘दत्तचंपूची रचना’ चुनीलाला मारवाड्याचा उद्धार.
    देवाचा दोष शमविण्यासाठी “करुणात्रिपदी” ची रचना, वाडीच्या पुजा-यांसाठी
    हिंगोली, भडेगांव, गोटेगांव, वाशीममार्गे श्रीक्षेत्र कारंजा. कारंजा शेगांवी श्री गजानन महाराजांची दृष्टीभेट.
    अमरावती करुन मुळ तापी पयस्वनीमंदाकिनी संगमावर स्नान. बासोदा, मुगावली, जालवन मार्गे ब्रम्हावर्त, काशीस आगमन. देवाचे आज्ञेने अदृश्य होऊन प्रयागाला प्रकट. संगमावर प्रयाग वळांचा उद्धार. ब्रम्हावर्त, जालवन, सिप्रीला गुणा छावणी, सारंगपूर, इंदोर, बलवाडा येथे सखाराम शास्त्री टिल्लूंच्या भिक्षेचा स्विकार.
  • १९०६ – बढवाई
    खेडेघाटी धर्मशाळेत सोळावा चातुर्मास – नर्मदाकाठी.
    इंदूरच्या कारभाऱ्याला येथे सर्व समान असल्याची ग्वाही. आंब्यांचा चमत्कार.
    श्री गांडा महाराज, श्री सीताराम महाराज आदी प्रमुखांची भारतभरातून गर्दी. योग, वेद आदींचे शिक्षण.
    सत्तू – ताक – फळे एवढाच आहार. भक्तांना मात्र रोज पक्वानै. मोठ्या मोठ्या पंक्ती.
    चार्तुमास समाप्तीनंतर फुलामाळांनी व धूपदीपांनी सजविलेल्या नौकेतून परतीरावर.
    सनावद मार्गे प्रवास करताना एक महिना जलाहारावर. केवळ तीन वेळा भिक्षा.
    पंढरपूर ते वाडी एका दिवसात प्रवास (८०/९० मैल) – ( अश्विन वद्य ६ ).
    श्री नृसिंहवाडीस ब्रह्मानंद मठात दोन महिने मुक्काम.
    पोस्टातील पत्र सामुग्री संपण्याचा उच्चांक.
    दुसरे रुप घेऊन धोंडोपंत काळकुंद्रीकरांच्या पत्नीच्या व्रताची सांगता.
    गुरुद्वादशीचा उत्सव. उकळत्या उष्णोदकाच्या स्नानातून देवाची सुटका.
    मनेरीकरांना छाटिचा प्रसाद. सातवळेकरांवर कृपा. वक्रतुंडबुवा श्रीगुरुदत्तावतारी अवतार ‘योगीराज’ सांगताच स्वामींचा इन्कार.
    गुळवणी महाराजांची भेट आणि मंत्र दीक्षा. देवाची रामेश्वरास जाण्याची आज्ञा.
    मार्गात मलिकवाड येथे वेदगंगेचे स्तवन. हिरण्यकेशीची स्तुती. सुलगा केंगेरी
    चिदंबर दीक्षितांचे स्तवन. गडाप्पा अण्णा कामतांना सगुण निर्गुण भक्तीचे शंकानिरसन, आणि मार्गदर्शन. नामजपाचे महत्त्व.
    बोठेस्वामींची भेट (कैवल्याश्रम स्वामी) श्रीशैल्य दर्शन तिरुपतीचे स्पर्श दर्शन. कालहस्ती, शिवकांची, विष्णूकांची पक्षीतिर्थाचे दर्शन, पिनाकिनीमातेची कृपा. मायावरमला आलेल्या वाडीकरांचे समाधान, आपल्या मृत्युची वावडी असून पाठवणी.
  • १९०७– तंजावर
    सतरावा चातुर्मास – श्रीकृष्णालहरीवर संस्कृत टीका.
    शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांचे सच्चिदानंदशिवाभिनवभारतींची भेट
    सदाशिवब्रम्हेंद्र सरस्वतींच्या समाधीचे दर्शन.
    चामरती येथे कृष्णामातेचे दर्शन “कृष्णापच्चक” स्तोत्राची निर्मिती.
  • १९०८ – मुक्त्याला
    मुक्तेश्वर- अठरावा चातुर्मास.
    युवाशिक्षा, वृद्धशिक्षा, स्त्रीशिक्षा या शिक्षात्रयींची निर्मिती.
    काश्मिरात जाण्याविषयी देव आणि स्वामींचा वाद. सप्तगोदेच्या परिसरात भ्रमण. कोगुर येथे दंडगुरुंच्या समाधिचे कळताच विधीवत स्नान. श्रीब्रम्हानंदसरस्वतींची भेट. पालरमार्गे पिठापूर.
    श्रीपादांच्या जन्मस्थानी पादुकांची स्थापना. कोकोनाडा येथे वाडीच्या पुजाऱ्यांची भेट माघारी वाडीस पाठवणी.
    श्रीब्रम्हानंदसरस्वतींच्या ‘भक्तवत्सल’ त्रिमूर्ती दत्ताची स्थापना. मंथन काळेश्वरी देवाशी वाद.
    ‘तव कोपा वंदू रुद्रा । तव चापा वंदू भद्रा’। या पदाची निर्मिती. देवाची स्तुती.
  • १९०९ – पवनी
    एकोणिसावा चार्तुमास वैनगंगेच्या सान्निध्यात. गांडाबुवा, सितारामबुवा सोबत.
    देवाच्या खजिन्यातुन यज्ञयाग, पुराण प्रवचने. येथे अनेकावर गुरुकृपा. भागुबाई वाशीमकरांना चांदिच्या पादुका.
    अंत्यजाची स्पर्शदर्शनेच्छा पुर्ण. प्लेगाचे निवारण.
    बळवंतराव नाईक कुटुंबाचा उद्धार. श्रीगुळवणी महाराजांना बीजमंत्रानुग्रहाची दीक्षा त्यांच्या कुटुंबावर कृपा. पुजारी कहुमामास पाषाण पादुका, दत्तमुर्ती प्रदान. उनकेश्वर माहूरहुन वचनपुर्तीसाठी श्री चे बार्शी पंढरपूर मार्गे वाडीस आगमन.
  • १९१० – वाडीत आगमन.
    महिन्याच्या वास्तव्यात. उत्सवाचे वातावरण
    साधलेकडुन गीतार्थ, बंधू सितारामबुवा, दीक्षितस्वामींवर प्रेमवर्षाव. देवाची शृंगेरीस जाण्याची आज्ञा. एकसंबा, बेळगांवमार्गे गुर्लहोसूर येथे ‘श्री दत्तस्तवस्तोत्राची’ रचना. मलपा प्रवाहात पुन्हा बोठे स्वामींची भेट.
    हावनूर – विसावा चातुर्मास- अनेकांचे संकटनिवारण.
    १०/१२ दिवसांत गुळवणी महाराजांचा योगाभ्यास. अजपाजपाचा संकल्प सांगुन मुळ आत्मस्वरुप दत्तात्रेयांचे त्यांना दर्शन घडविले. वैष्णव शैवात सुसंवाद.
    हावेरीच्या रेल्वे स्टेशन मास्तराचा सत्कार.
    हावनूर- तुंगाकिना-याने प्रवास. आगठी कुपेलूर. शृंगेरीच्या गादीला वंदन. वनवासी मधुकेश्वराचे दर्शन दिड महिना वास्तव्य.गलगलीत वैष्णव शैव वादात समेट, निरसन येथे १२ स्वाहाकार.
  • १९११ – जैनापूर
    वैशाखात मलप्रभा कृष्णा संगमावर. कोपरगांव नरसिंहक्षेत्र कडलूर मार्गे कुरुगुडी. कुरवपूर- एकविसावा चातुर्मास.
    श्रीपादश्रीवल्लभांची कर्मभूमी. कृष्णाभीमासंगमावर, गांडाबुवांना श्रींचे सप्तसंदेश. “ घोरसंकट निवारण स्तोत्राची” निर्मिती.
    कृष्णातीराने परळीवैजनाथ. तुळजापूर अंबेजोगाईबापूजी गोसाव्यांना अद्वैताचा बोध. राजूरचा स्वाहाकार.
    अनेक सतपुरुषांची उपस्थिती. या कालात वीस यज्ञ स्वाहाकार दोन चातुर्मास याग दोन ठिकाणी दत्तपादुकांची स्थापना. अप्पा देव, अण्णादेवांना अरण्याची शिकवण. पैठणात कृष्णमंदिरात मुळ जागेवर कृष्णमूर्तीची स्थापना.
    गांडामहाराजांची भडोचला रवानगी.
  • १९१२– चिखलदा
    बाविसावा चातुर्मास – सहासात महिने मुक्काम, महामारीसाठी सप्तशतीपाठ. नवरात्रात श्रीदुर्गासप्तशतीचे स्पष्टीकरण. अनेक सन उत्सवाची घाई.बाळशास्त्री हरदास, गोविंदबुवा हरदासावर कृपा. गंगाधरपंत आणि बाळाभाऊ वैद्यावर कृपा. गंगाधरपंतांना उपनिषदे भा।ष्यासहित, श्रीलघुवासुदेव मननसार, आत्मचिंतन, अध्यात्मरामायणाची शिकवण.
  • १९१३ – कातरखेडा
    जंगलाचा प्रदेश. डहीच्या महाराजांकडील रामनवमीच्या उत्सवानंतर दशमीला गरुडेश्वरी प्रयाण.
    जंगलात अश्वत्थामाने मार्ग दाखवून नर्मदा किनारी गरुडेश्वरी. चैत्र वद्य अष्टमी शके १८३५ इ.स. १९१३.
    गरुडेश्वरी – तेविसावा चातुर्मास- देवाज्ञेने येथेच कायमचे वास्तव्य.
    धोंडोपंत कोपरकरांनी नारदेश्वराच्या पश्चिमेला टपरी बांधली. ‘पर्णकुटी’ आज समाधीमंदिर तेथेच आहे.
    आत्मनात्मविचार पूर्वभाग अभ्यास प्रकरण, उत्तरभाग चिंतन प्रकरण.
    चित्तसदबोधनक्षत्रमाला, श्रीदत्तभावसुधारस स्तोत्राची रचना.
    रामचंद्र तेंडुलकरांवर कृपा. गुरुद्वादशी, दिवाळीचा उत्सव साजरा केला. रामभाऊ सबनीसांवर कृपा. ब्रम्हानंदसरस्वतींचे आगमन. गुळवणीमहाराजांना ब्रम्हसूत्रवृत्तीची शिकवण. चांदोदच्या दलितभक्तांची स्पर्शदर्शन इच्छापूर्ती. चार तास भजनात रममाण.
    शुद्र भक्ताला पाषाण पादुका, ज्या आज समाधी मंदिराच्या प्रांगणात आहेत.
  • १९१४ – गरुडेश्वर
    सर्वांच्या इच्छांची पूर्ती. सा-या अंतरंग भक्तांना दूर त्यांच्या स्थानी पाठवून दिले.
    १९१४ चैत्र महिना : अत्यंत आनंदात, सारे गुरु सहवासात रमले. वैशाखात अतिसार त्रास देऊ लागला. नित्यकर्मे होणे कठीण झाले. वाडीस दीक्षितमहाराजांनी अनुष्ठान सुरु केले.
    ‘येथेच राहणार आहे’. याचा प्रकाशकरांना उलगडा. श्रीकृष्ण परमात्म्याचे स्तवन सुरु केले जे भीष्मपितामहांनी शरपंजरी अंती केले होते ते लोकांना ऐकविले. दोन दिवसात एक न्यास पत्र तयार केले.पंचमंडळ नेमले. यात ब्रम्हानंद सरस्वतींची मदत. ज्येष्ठ महिन्यात बाहेर जाणे, येणे,खाणे वर्ज्य. अन्न त्याग.
    पाटावर स्नान. ज्येष्ठ वद्य अष्टमीला समाधी लावून मृत्यूवेळ टाळली. धोंडोपंत कोपरकरांवर कृपेची बरसात.

ज्येष्ठ अमावास्या टाळून जेरेशास्त्र्यांना बोलावून घेतले. “जाणे आता निश्चित असल्याचे” स्पष्ट केले. ब्रम्हानंदसरस्वतींचे गीता पठण. रात्री साडे अकरा पर्यंत भजन चालले. अमावास्या संपून प्रतिपदा सुरु होताच श्रींना उठून बसण्याची घाई झाली. सिद्धासन घालून देवाकडे तोंड करुन आसनस्थ होऊन, उपदेश केला. प्राणायामाने श्वास रोखून दीर्घ प्रणव उच्चार करुण श्री शांत झाले. दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदा मंगळवार शके १८३६ आनंदनाम संवत्सर आर्द्रा नक्षत्र. उत्तरायण श्री समाधी लीन झाले

यतीश्रेष्ठ संतशिरोमणींचा जन्म आनंदनाम संवत्सरी झाला आणि श्रींनी समाधी ही आनंदसंवत्सरी घेतली – इ.स २३ जून १९१४.