अशी श्री दत्तरुप विभूतीचे जन्मस्थान म्हणजे माणगांव,आयुष्याची सुरुवातीची ३५ वर्षे त्यांचे या गावांत वास्तव्य होते.त्यांच्या वास्तव्याने माणगांव तीर्थक्षेत्र बनले.आधुनिक सुख-सोयींमुळे दूरवरच्या लोकांची,भक्तगणांची ये-जा वाढली.मंदीराजवळ श्री अन्नपूर्णा भवन व भक्तनिवास सध्या आहेतच,पण भाविकांच्या व धर्मशाळेच्या जागी नवीन प्रशस्त दुमजली श्री अन्नपूर्णा भवन इमारतीचे बांधकाम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. श्री प.प..वासुदेवानंद सरस्वतींच्या पत्नीचे नांव सौ. अन्नपूर्णा होते.त्यामुळे त्यांचे स्मरणार्थ म्हणून या अन्नदान विभागाच्या इमारतीचे नांव श्री अन्नपूर्णा भवन असे देण्याचे ठरविण्यात आले आहे.
स्वामींच्या जीवनाचा आश्रय घेऊन वरील वास्तुशिवाय मंदीराच्या परीसरात वेदपाठशाला व निवासी खोल्या, यतींसाठी निवासस्थान बांधण्याचे काम श्रीं चे जन्मस्थानजवळ सुरु आहे.तरी यासाठी कृपया सढळ हस्ते मदत करावी ही विनंती. गोशाला,श्री निर्मला मातेचे मंदीर,पुजा-यांसाठी निवास,मंदीराला लागून असणा-या डोंगरावर – श्री स्वामींच्या तपश्र्चर्येने पुनीत झालेल्या गुहेकडे जाणारा रस्ता आणि इतर आनुषंगिक विविध कामे हाती घ्यावयाची आहेत.स्वामींच्या कृपाशिर्वादानेही सारी कामे यशावकाश पूर्ण होतीलच,पण आपण सर्वांनीही,स्वामींबद्दल कृतज्ञता,ऋणबुद्धी मनात बाळगून,ची प्रकट करण्याकरता काही योगदान द्यावे.आपण आपले सहकार्य आर्थिक स्वरुपात,वस्तूंच्या स्वरुपात,सेवेच्या स्वरुपात देऊ शकता.
आर्थिक सहाय्य श्री दत्तमंदीर माणगांव,जि.सिंधुदुर्ग या नावे रोख/चेक/ड्राफ्ट अथवा मनिऑर्डर व्दारा करता येईल.
श्री दत्तमंदीर,माणगांव.
मु.पो.माणगांव,ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग,महाराष्ट्र, ४१६ ५१९.
दूरध्वनी – (०२३६२) २३६२४५, २३६०४५.
संगणकीय पत्ता – shreedattamandirmangaon@gmail.com
संकेत स्थळ – www.tembyeswami.in
माणगांवच्या श्री दत्तमंदीराला जरुर भेट दया, काम बघा, आपल्याला उत्स्फूर्ततेने सहकार्य करावेसे वाटले, स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच.
वैद्य रामचंद्र जनार्दन गणपत्ये, अध्यक्ष
श्री दत्तमंदीर,माणगांव.