भक्ताभिष्ट फलप्रदां त्रिनयनां जांबुनदांभ प्रभाम ।
पाणिभ्यां दधतिमसिंच जलजं दुर्धर्ष दैत्यापहाम ।।
मुक्तारत्नसुवर्ण भूषणधरां दिव्यांबरीं सुंदरीम ।
माणग्राम महेश्र्वरीं भगवतीं श्री यक्षिणीं मंगलम् ।।

श्री. प. प. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री क्षेत्र नृसिंहवाडीस असतांना मध्यान्ह समयी भीक्षेसाठी अमरापूरला जायचे. तेथे ६४ योगिनी त्यांचे स्वागत, पूजन करत. भिक्षा वाढत असत. या सगळ्या योगिनींनी अमरापूर सोडून न जाण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा महाराज म्हणाले मी या औदंबरातच सूक्ष्म चैतन्यरुपाने वास करुन भक्तांच्या कामना पूर्ण करीन. ते श्री देवी यक्षिणीला म्हणाले,

नाम आहे कोकण, सुंदर वाटिका जाण
त्यांत आहे माणग्राम, वास तेथे करावा
तयेग्रामी टेंब्ये वंश, माझा भक्त गणेश
त्याचे पोटी ईश्वरी अंश, तोचि योगीराज जाणावा
ग्राम आहे ओस, तेथे करावा तू वास
साह्य व्हावे भक्तांस, तपस्वी असती जे कोणी
ब्रह्मराक्षस वेताळ, पिशाच्च गणांचा मेळ
राहे तेथे सर्व काळ, मनुष्यमात्रा हिंसती

माझा पुढचा अवतार माणगांवी होणार आहे. तेथे मनुष्यवस्ती नाही. तेथे ब्रह्मराक्षस, वेताळ, भूत, प्रेत, पिशाच्चांचा संचार आहे. त्यामुळे तेथे तू जाऊन भूत पिशाच्चांचा प्रबंध कर. मनुष्यवस्ती निर्माण कर. महाराजांच्या या आदेशानुसार श्री यक्षिणी माता श्री देव शंकरासोबत माणगांवी आली.

त्यावेळी माणगांव मध्ये एक कुंभार परमेश्वराचे चिंतन करत एकटाच राहत असे. दुसरा कोणी मनुष्य एक रात्रसुध्दा राहायला तयार नसे. श्री देवी यक्षिणी मातेने शंकराला गाव पाहण्यासाठी पाठविले. त्यावेळी शंकर एका वाण्याच्या रुपात कुंभाराला भेटले. सर्व सीमांची पाहणी केली.

मध्यग्रामी वैश्यनाथ, अपुले नामी लिंग स्थापित ।
म्हणे कार्य झाले आता येथ, जाऊ सत्वर गृहाशी ।।

माणगावातील मध्यवर्ती जागेची पाहणी करुन स्वतः शंकरानी शिवलिंगाची स्थापना केली. महादेव मंदिरासमोरच श्री देवी यक्षिणीचे मंदिर आहे. संपूर्ण भारतात यक्षिणीचे एकच मंदिर आहे. शंकरानी आपल्या गणाला पाठवून वेताळाला बोलाविले. ते वेताळाला म्हणाले, श्री देवी यक्षिणी येथे राहणार आहे. त्यामुळे या गावात मनुष्यवस्ती होणे आवश्यक आहे. तू भूत पिशाश्र्चांचा बंदोबस्त कर. मनुष्यमात्राला यांचा त्रास होता कामा नये.

हळूहळू मनुष्यवस्ती वाढत गेली. ग्रामदेवता यक्षिणी मातेचे गावात आगमन झाले. श्रावण वद्य पंचमी शके १७७६ ( दि. १३ ऑगस्ट १८५४ ) रोजी महाराजांचा जन्म झाला आणि माणगांव त्यांच्या जन्माने पुनित झाले.  माणगांव गावातील मूळ भूमिका श्री देवी सातेरी असून तिचे स्वतंत्र मंदिर जवळच आहे. तसेच वेतोबाचे ( वेताळ ) मंदिर देखील एक कि. मी. अंतरावरच आहे.

श्री देवी यक्षिणी मंदिरात होणारे वार्षिक महत्वाचे पाच कार्यक्रम :

  1. चैत्र शुद्ध १ ते १० रामनवमी
  2. आश्विन शुद्ध १ ते १० विजया दशमी
  3. कार्तिक शुद्ध ५ ते १२ सप्ताह
  4. त्रिपुरी पोर्णिमेच्या दुस-या दिवशी जत्रा
  5. माघ वद्य ८ वर्धापन दिन

श्री .प.प. वासुदेवानंद सरस्वती कृत  यक्षिणीची आरती
ओवाळू यक्षिणी तुज विमले । विज्ञान दे मज पहिले ।।धृ०।।
कार्तिक मासी वैशाख मासी । होती उत्सव भले ।।ओ०१।।
शरदि वसंती नवरात्र होती । उत्सव तुझे चांगले ।।ओ०२।।
आश्विन दसरा होता वाटे दुसरा । आला नाक तेथे वत्सले ।।ओ०३।।
फाल्गुनि शिमगा हो कां दाविरंगा । तुझे गांवी शिवमहिले ।।ओ०४।।
वळखुनि भावा तुवा वासुदेवा । भवा हरूनि तारिले ।।ओ०५।।

कै. श्री दिवाकर शास्त्री साधले यांनी केलेली श्री देवी यक्षिणीची आरती
महिषाख्या सुरमर्दिनी दाक्षायणि माये। माणग्रामस्थ जनोध्दारिणी हर जाये।
भक्तानुग्रह कारिणी सर्वामरपुज्ये। सकलारिष्टे निरसुनि पालय मा सदये।
जय देवी जय देवी श्री यक्षिणी अंबे। आरती ओवाळु तुज हत दैत्य कदंबे।।धृ।।
दुर्गे दृष्कृत नाशिनीं दुर्गासुर हरणे । दुष्ट निबर्हिणी दुस्तर भवनिधी जलतरणे।
दु ख दवाग्नि प्रशमनि दुर्ज्ञेया चरणे । दुर्लभ दर प्रदायिनी वंदे तव चरणे।
जय देवी जय देवी श्री यक्षिणी अंबे। आरती ओवाळु तुज हत दैत्य कदंबे।।1।।
त्रिजगज्जनि भवानि देवी जखुबाई । ग्रामस्वामिनी भगवती आमुची तु आई।
तुजवाचुनि मज रक्षक कोण जगी नाही। म्हणुनि दिवाकर विनवि वंदुनि तव पायी।
जय देवी जय देवी श्री यक्षिणी अंबे । आरती ओवाळु तुज हत दैत्य कदंबे।।2।।

श्री देवी यक्षिणी मंगलाष्टके
उद्यत्पूर्ण सुधांशु कोटि धवलां, विद्युल्लसव्दाससाम्।सौवर्णाभरणां प्रसन्न वदनामुत्तुंग वृक्षोरुहाम्।।
पीनश्रोणि तट प्रवेक रशनां शक्तिं परां शांभवीम्। शस्त्रीपात्रकरां स्वभक्तवरदां नित्य भजे यक्षिणीम्।।१।।
भ्राजत्कर्ण विभूषणच्छविलसग्दंडांच शस्त्रींतथाs मंत्रं संदधतीं द्विबाहु मनिशं शुभ्रांशु कोटि प्रभाम्।।
बिभ्राडंबर धारिणी प्रविकसद्वत्क्रांबुजां मंडिताम्। सेवेहं शिवशक्तिमीष्ट वरदां श्री यक्षिणी मंगलम्।।२।।
या विद्येत्यभिधीयतेश्रुतिपथे शक्तिः सदाद्यापरां। सर्वज्ञा भवबंध छित्तिनुपुणा सर्वाशये संस्थिता।
दुर्ज्ञेया सुदुरात्मभिश्च मुनिभिः ध्यानास्पदं प्रापिता। प्रत्यक्षा भवतीह सा भगवती श्री यक्षिणीं मंगलम्।।३।।
अद्यांह तव पाद पंकज परो गोदान गर्वेण वै। धन्योsस्मिति यथार्थ वाद निपुणो जातः प्रसादाच्चते।।
याचेत्वां भवभीतिनाशचतुरां मुक्ति प्रदांचेश्वरीम्। हित्वामोहकृतं महार्ति निगडं श्री यक्षिणीं मंगलम्।।४।।
या वाचस्पतिना सुरेंद्र पुरतो नाके सदास्तूयते।।
भू लोके ऋषयः शुभं सुचरितं यस्याश्चिरं पठ्यते। सा देवी प्रकारोतु नो नवरतं श्री यक्षिणीं मंगलम्।।५।।

।। श्री यक्षिणी माता की जय ।।