श्री क्षेत्र माणगांव येथील १. श्री दत्त मंदिर आणि २. श्री. प. प. टेंब्ये स्वामींचे जन्मस्थान या दोन्ही स्थानांपैकी भक्तांच्या इच्छेनुसार कोणत्याही एका स्थानी खालील धार्मिक पूजा विधी होतात. भक्तांच्या अधिकारानुरुप वेदोक्त अथवा पुराणोक्त धार्मिक विधी केले जातील.
धार्मिक पूजा विधी ( कोणत्याही एका स्थानावर )
खालील धार्मिक पूजाविधींना यजमान स्वतः उपस्थित राहू शकतात. यजमानांना उपस्थित राहणे शक्य नसल्यास पुजा-यांकरवी विधी करुन घेतला जातो. यजमानांच्या विनंतीनुसार प्रसाद पोष्टाने घरी पाठविला जातो (केवळ भारतात)..
धार्मिक सेवा | सेवा मूल्य | सेवेची तपशीलवार माहिती |
अभिषेक पूजा | १०१/- | श्री दत्तमंदिर मध्ये दत्तमहाराजांच्या पादुकावर किंवा श्रीं चे जन्मस्थानी महाराजांच्या पादुकांवर महिम्न किंवा रुद्राची आवर्तने केली जातात. प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यास यजमानाला फक्त अभिषेकाचा संकल्प करता येतो व संकल्पासाठी गणेश पूजन आणावे लागते. |
पादुकापूजन | ३५१/- | श्रीं चे जन्मसाथानी पादुकांवर अभिषेक, पंचामृत स्नान, नैवेद्य, षोडशोपचार पूजा, महानैवेद्य. |
श्री सत्यदत्तपूजा | ५०१/- | प्रश्नावलीतील उत्तरादाखल ही पूजा येते. श्री सत्यनारायण पूजेसारखीच ही पूजा असते. दर पौर्णिमेला या पूजा सामूहिकरित्या केल्या जातात. |
श्री सत्यदत्तपूजा पौर्णिमेव्यतिरिक्त | १०००/- | “श्रीं” चे जन्मस्थानी ही पूजा केली जाते. सत्यनारायण पूजेसारखीच ही पूजा असते. वैयक्तिकरित्या श्रीं चे जन्मस्थानी ही पूजा करता येते. |
लघुरुद्राभिषेक | ३५००/- | महिम्न किंवा रुद्राच्या ११ एकादशिण्या म्हणजे एक लघुरुद्र. कोणत्याही एका स्थानावर भक्ताच्या इच्छेनुसार कुठच्याही एका उपलब्ध व शुभ दिवशी लघुरुद्र केला जातो. भक्तांकरवी संकल्प करुन घेतला जातो. |
अभिषेक व महापूजा व्यतिरिक्त अन्य पूजा विधी उपलब्ध वेळेनुसार होतील. त्यासाठी किमान ८ दिवस अगोदर कार्यालयाशी संपर्क साधावा.
पारायण विधी ( कोणत्याही एका स्थानावर )
खालील धार्मिक पूजाविधींना संकल्पावेळी किंवा सर्व दिवस यजमान स्वतः उपस्थित राहून श्रवण करु शकतात. यजमानांना उपस्थित राहणे शक्य नसल्यास पुजा-यांकरवी विधी करुन घेतला जातो. यजमानांच्या विनंतीनुसार प्रसाद पोष्टाने घरी पाठविला जातो. (केवळ भारतात). ब्राह्मणांच्या उपलब्ध वेळेनुसार होतील.
श्री गुरुचरित्र पारायण | ५०००/- | श्रीगुरुचरित्र ग्रंथ ब्राह्मणाकरवी वाचून घेतला जातो. त्या ब्राह्मणास दक्षिणा दिली जाते. हे पारायण ३ किंवा ७ दिवसात केले जाते. |
श्री दत्तमाहात्म्य पारायण | ३५००/- | श्री. प. प. स्वामी महाराज लिखित दत्तमहात्म्य ग्रंथाचे पारायण ब्राह्मणाकरवी वाचून घेतले जाते. त्या ब्राह्मणास दक्षिणा दिली जाते. हे पारायण ३ किंवा ७ दिवसात वाचले जाते. |
श्रीसप्तशतीपारायण | ५००/- | श्री. प. प. स्वामी महाराज लिखित सप्तशती ग्रंथाचे वाचन ब्राह्मणाकरवी करुन घेतले जाते. त्या ब्राह्मणास दक्षिणा दिली जाते. १ दिवस -३ तास |
श्री समश्र्लोकी पारायण ( संस्कृत ) | ६०००/- | श्री. प. प. स्वामी महाराज लिखित या ग्रंथाचे सात दिवसात ब्राह्मणाकरवी वाचन केले जाते व त्यास दक्षिणा दिली जाते. हे पारायण ७ दिवसात केले जाते. |
श्रीं ची पालखी सेवा ( केवळ श्री दत्त मंदिर स्थानी )
श्रीं ची पालखी सेवा (३५००/-) : भक्ताच्या इच्छेनुसार कुठचाही एका उपलब्ध दिवशी व शुभदिनी पालखी काढली जाते. श्री दत्त मंदिरला तीन प्रदक्षिणा केल्या जातात. वाद्यांच्या तालावर अभंग, पदे, अष्टके म्हटली जातात. दिगंबरा दिगंबरा …… या मंत्राचा जयघोष केला जातो. एकूणच वातावरण संपूर्ण मंगलमय असते.
श्री गुरुद्वादशी ते वैशाख पौणिमे पर्यंत दर महिन्याच्या पौणिमेला पालखी सोहळा संस्थेमार्फत संपन्न होतो. पालखी सोहळा सायंकाळी आरतीनंतर ७.१५ ते ९ पर्यंत असतो.
नंदादीप सेवा ( कोणत्याही एका स्थानावर )
- एक सप्ताह नंदादीप सेवा (१५०/-) : कोणत्याही एका स्थानावर तेवत असणा-या नंदादीप (वात तेल ) साठी एक आठवड्याचा साधारणत: येणारा खर्च.
- एक मास नंदादीप सेवा (५००/-) : कोणत्याही एका स्थानावर तेवत असणा-या नंदादीप ( वात तेल ) साठी एक महिन्याचा साधारणत: येणारा खर्च.
बहुवर्षिय धार्मिक विधी
अष्टदशवर्षिय पूजा योजना | १००१/- | श्रीं चे जन्मस्थानी एकावर्तन अभिषेक व संकल्पानुसार श्रीं चे चरणी प्रार्थना. वर्षातून एक वेळा असे सलग १८ वर्षे प्रसाद पाठविला जाईल. यजमान निवर्तल्यास अभिषेक बंद होईल. |
अष्टदशवर्षिय अभिषेक पूजा योजना | १५०१/- | श्री दत्त मंदिर स्थानी… |
अष्टदशवर्षिय अन्नदान योजना | २००१/- | श्री दत्त मंदिरात अन्नदान व संकल्पानुसार श्रीं चे चरणी प्रार्थना. अन्नदान होऊन प्रसाद वर्षातून एक वेळा असे सलग १८ वर्षे प्रसाद पाठविला जाईल. |
अष्टदशवर्षिय उत्सव अन्नदान योजना | २५०१/- व त्यापुढे | श्री दत्त मंदिरात अन्नदान व संकल्पानुसार श्रीं चे चरणी प्रार्थना. येथे होणा-या उत्सवांपैकी भक्तांनी निवडलेल्या उत्सवापैकी एका उत्सवाला अन्नदान होऊन प्रसाद वर्षातून एक वेळा असे सलग १८ वर्षे प्रसाद पाठविला जाईल. |
अष्टदशवर्षिय बृहत अन्नदान योजना | २५००१/- व त्यापुढे | श्री दत्त मंदिरात अन्नदान व संकल्पानुसार अभिषेक व विनाशुल्क अन्नदान होईल. प्रसाद सलग १८ वर्षे पाठविला जाईल. यजमान निवर्तल्यास अभिषेक बंद पण अन्नदान सुरु राहील. |
पंचविंशतीवर्षिय अन्नदान योजना | ५१००१/- व त्यापुढे | श्री दत्त मंदिरात अन्नदान व संकल्पानुसार अभिषेक व विनाशुल्क अन्नदान होईल. प्रसाद सलग २५ वर्षे पाठविला जाईल. यजमान निवर्तल्यास अभिषेक बंद पण अन्नदान सुरु राहील. |
एकपंचाशतवर्षिय अन्नदान योजना | १००००१/- व त्यापुढे | श्री दत्त मंदिरात अन्नदान व संकल्पानुसार अभिषेक व विनाशुल्क अन्नदान होईल. प्रसाद सलग ५१ वर्षे पाठविला जाईल. यजमान निवर्तल्यास अभिषेक बंद पण अन्नदान सुरु राहील. |
विनंती :
१. पत्ता बदल झाल्यास किंवा यजमान निवर्तल्यास भक्तांनी कृपया कार्यालयाला लेखी कळवावे.
२. शाश्वत पुजा व शाश्वत अन्नदान या योजनेमध्ये ३१ मार्च २०१२ पर्यंतच देणगी देवू शकता.
३. नवीन योजना १ एप्रिल २०१२ पासून पुढे चालू राहतील.
४. पूर्वीच्या योजना जशा आहेत तशाच सुरु राहणार आहेत.
५. एखाद्यावेळी काही कारणानाने प्रसाद पावती परत आल्यास पुन्हा प्रसाद पाठविला जात नाही, मात्र धार्मिक विधी होतात.त्यामुळे भक्तांना प्रसाद मिळत नाही अशा भक्तांनी कृपया आपला पावती नंबर किंवा विधी दिन या सह संपर्क साधावा.
- बांधकाम निधी : श्री दत्त मंदिर माणगांवने विविध बांधकामे हाती घेऊन पूर्णत्वास नेली आहेत. परंतू वाढत्या व्यापामुळे अजून बांधकामे व आवश्यक अशा जागी सुधारणांची आवश्यकता भासत आहे. आपण या करिता रोख देणगी देऊ शकता. तसेच कृपया कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक अशी वस्तू देणगी स्वरुपात देऊ शकता.
- विशेष निधी : श्री दत्त मंदिर मध्ये आवश्यकतेनुसार विविध योजना गरजेनुसार पूर्णत्वास आणल्या जातात. यासाठी कृपया कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक अश्या वस्तू आपण देणगी रुपाने किंवा तेवढे मूल्य देऊ शकता.
- वस्तू रुप देणगी : श्री दत्त मंदिर मध्ये आवश्यकतेनुसार विविध योजना गरजेनुसार पूर्णत्वास आणल्या जातात. यासाठी कृपया कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक अश्या वस्तू आपण देणगी रुपाने देऊ शकता.