श्री. टेंबेस्वामींनी त्यांच्या ‘दत्तात्रेय षोडशावतार’ या ग्रंथात दत्तात्रेयांनी सोळा अवतार घेतल्याचा तपशीलवार व जन्मतिथीसह वृत्तांत दिला आहे. हे अवतार अत्री ऋषी व अनसूया यांचेसाठी (पुत्र म्हणून) व इतर भक्तांसाठी व सर्वांचे कल्याण करून त्यांना उपदेश देण्यासाठी घेतले होते. हे अवतार याप्रमाणे : योगीराज, अत्रीवरद, स्वयं दत्त, कालाग्नीशमन, योगीजनवल्लभ, लीलाविश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभरावधूत, मायामुक्तावधूत, याच नावाचा (मायामुक्तावधूत) आणखी एक अवतार, आदिगुरू, शिवरूप, देवदेवावतार, दिगंबर, शामकमल लोचन हे होत.

Leave a Reply

19 + 14 =