श्री वेताळ भावई मंदिर हे माणगांवातील अति प्राचीन मंदिर आहे. सदर मंदिर पूर्वी व आता असलेल्या श्री महादेव मंदिराच्या समीप होते. या श्री वेताळ भावई मंदिराचे पुजारी श्री घाडीगांवकर परीवाराने त्यांच्या घराजवळ १६३५ साली वेताळाचे टेंब येथे श्री देव वेताळ पंचायतन देवस्थानची रितीरिवाजाप्रमाणे स्थापना केली. आत्ता असलेले हे छोटेखानी मंदिर १९९४ साली बांधण्यात आले असून हे मंदिर श्री दत्त मंदिर पासून २ कि.मी. अंतरावर आहे. निसर्ग रम्य अश्या ठिकाणी हे मंदिर आहे. वेताळ मुर्ती ऐवढी सुंदर आहे कि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी सुंदर मुर्ती पहावयाला मिळत नाही.

Leave a Reply

four + 15 =