श्री नृसिंह सरस्वतींच्या श्री क्षेत्र अमरेश्र्वर कार्यसमाप्तीच्या वेळी चौसष्ट योगिनींपैकी प्रमुख यक्षिणीला नृसिंह सरस्वतींची सेवा मिळावी यासाठी तिने महारजांकडे प्रार्थना केली. त्यावेळी नृसिंहसरस्वतींनी आपला अवतार श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींच्या रुपाने माणगांवी होणार आहे. त्यामुळे तू माणगांवी जा. तेथे गांव वसव असे सागितले. देवीला दिलेल्या वचनानुसार श्री यक्षिणी देवीची उपासना करुन श्री स्वामी महाराजांनी तिला प्रसन्न करुन घेतले होते. श्री दत्तप्रभुंची कृपा इच्छिणाऱ्यांनी या स्थानात श्री देवी यक्षिणी मातेची प्रार्थना व सेवा करावी. श्री यक्षिणी देवीचे मंदिर हे जैन कलाकृती पध्दतीचे लाकडातील मंदिर आहे. २३ व्या जैन तिर्थकरांची मुर्ती या मंदिरात आहे. श्री दत्त मंदिरच्या समोरच २०० मीटर अंतरावर हे मंदिर आहे. श्री यक्षिणी देवी चे अशा प्रकारचे भारतातील हे एकमेव मंदिर आहे.

Leave a Reply

fifteen + 2 =