श्री नृसिंह सरस्वती अवतार समाप्तीच्या वेळी श्री यक्षिणी देवीला दिलेल्या वचनानुसार श्री दत्तप्रभुंनी श्री देवी यक्षिणी मंदिर नजीक असलेल्या वास्तुमध्ये श्रावण कृष्ण पंचमी शके १९७६( दि.१३.८.१८५४ ) रोजी जन्म घेतला. श्री प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी अध्ययनाध्यापन उपासना केली. श्री दत्तमहाराजांनी येथे वास्तव्य केले आहे. त्यांनी आषाढ शुध्द प्रतिपदा शके १८३६ ( दि. २४.६.१९१४ ) रोजी नर्मदाकाठी श्री क्षेत्र गरुडेश्वर (गुजरात) येथे समाधी घेतली व निर्मला ते नर्मदा असा प्रवास अखेरीस दत्तरुप झाला .
श्री. प. पू. सीताराम महाराज यांचे सुध्दा हे जन्मस्थान होय.चैत्र शुध्द पंचमी शके १७८० रोजी श्री सीताराम महाराजांचा जन्म ह्या स्थानी झाला.श्री सीताराम महाराज हे टेंब्ये स्वामींना गुरु मानीत. श्री क्षेत्र झिरी बडनेरा ( जि. अमरावती ) येथे त्यांनी फाल्गुन शुध्द अष्टमी शके १८४० ( ०९.०३.१९१९ ) रोजी समाधी घेतली.
नंतर या जन्मस्थानच्या वास्तुचा कै. अ. सौ. इंदिराबाई होळकर ( रा. इंदौर, म.प्र. ) यांनी जीर्णोध्दार सन १९४० मध्ये केला. कालांतराने ही इमारत जीर्ण झालेने तत्कालीन विश्वस्त मंडळाने या ठिकाणी महाराजांच्या इच्छेनुसार नवीन वास्तु २७ डिसेंबर २००२ रोजी पूर्णत्वास आणली. हे जन्मस्थान श्री दत्त मंदिरच्या समोरच २०० मीटर अंतरावर आहे.

All the staff members of Mangaon Datta Mandir are sincere, dedicated and having cooperative attitude. I have been visiting this holiest place. Thanks to Respective Dr. Dadasaheb Ganpatye, Chairman of Mangaon Datta Mandir.