सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची ।l कंठी झळके माळ मुक्ताफळांची।।१।।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शन मात्रे मन कामना पुरती ।।धृ०।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा चंदनाची उटी कुंकमकेशरा ।
हिरेजडित मूगुट शोभे तो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया ।।२।।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शन मात्रे मन कामना पुरती ।।धृ०।।

लंबोदर पितांबर फणिवर बंदना । सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।३।।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शन मात्रे मन कामना पुरती ।।धृ०।।

Leave a Reply

five × 5 =