करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरवुनिया मन ।। दत्तात्रेया सदगुरुवर्या भावार्थेकरुन ।।धृ।।
धरणीवर नर पीडित झाले भवरोगें सर्व ।। कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापुनि सगर्व ।।
योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व ।। सुलभपणे निजभजनें त्यांसी उध्दरी जो शर्व
करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरवुनिया मन ।। दत्तात्रेया सदगुरुवर्या भावार्थेकरुन ।।धृ।।
अत्रिमुनींच्या सदनीं तीनी देव भुके येती ।।भिक्षुक होऊनि अनसूयेप्रति बोलति त्रयमूर्ती।।
नग्न होऊनि आम्हांप्रति द्या अन्न असे वदती।। परिसुनि होऊनि नग्न अन्न दे तंव ते शिशु होती।।२।।
करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरवुनिया मन ।। दत्तात्रेया सदगुरुवर्या भावार्थेकरुन ।।धृ।।
दुर्वासाभिद मौनी जाहला शंभु प्रमथेंद्र।। ब्रम्हदेव तो जाहाला चंद्र जाहाला तो उपेंद्र।।
दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारकयोगींद्र।। वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्य अतंद्र।।३।।