कृष्णापंचगंगा संगम निजस्थान । चरित्र दाऊनि केले गाणगापुरी गमन ।
तेथे भक्त श्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण । विश्वरुपे तया दिधले दर्शन । जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता ।
नरसिंह सरस्वती जय विश्वंभरितां ।। धृ ।।

वंध्यांसाठी वर्षे पुत्रनिधान । मृत ब्राम्हण उठविला तीर्थ शिंपुन ।
वांझ महिषी काढवी दुग्ध दोहून । अत्यंजाचे वदनीं निगम संपूर्ण ।। जय ।।

शुष्क काष्टी पल्लव लावुनि लवलाही । कुष्टी ब्राम्हण केला शुध्द निजदेही ।
अभिनव लीला ज्याची वर्णूं मी काई । म्लेंच्छ राजा येऊनी वंदितसे पायीं ।। जय ।।

दीपावळीचे दिवशी भक्त येऊनी । आठहि जण ठेविती मस्तक तव चरणीं ।
आठहि ग्रामी भीक्षा केली ते दिनी । निमिषमात्रे नेला तंतुक शिवस्थानीं ।। जय ।।

ऐसे चरित्र दावुनि जड मूढ उध्दरिले । भक्तवत्सल ब्रीद जगती मिरवीले ।
अपार महिमा म्हणऊनि वेदश्रुती बोले । गंगाधरतनय वंदी पाऊले ।। जय ।।

This Post Has 2 Comments

  1. Patankar

    I want audio or videos of this aarati whatappn 94235766y4

  2. सुरेश पाटील धर्माबाद जि नांदेड

    🙏🙏
    जय गुरुदेव !! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!

Leave a Reply

eleven − 10 =