श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती व त्यांचे बंधू प. पू. सीताराम महाराज टेंब्ये यांचा ज्या घरात जन्म झाला, त्या घराचा जीर्णोध्दार कै. इंदिराबाई होळकर यांनी सन १९४०मध्ये केला. ही इमारत बरीच वर्षे झाल्याने जीर्ण झालेली होती. त्यामुळे तत्कालीन विश्वस्त मंडळाने जन्मस्थानचा जीर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला.

तत्कालीन अध्यक्ष वि. य. तथा आबाजी बांदेकर यांच्या पुढाकाराने सन २००० सालामध्ये सुरुवात करण्यात आली व डिसेंबर २००२ मध्ये काम पूर्ण होऊन ता. २७ डिसेंबर २००२ रोजीच्या शुभ मुहुर्तावर जन्मस्थानी पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याचवेळी श्री. प. प. कालिकानंद तीर्थ, कोल्हापूर व श्री. प. प. दामोदरानंद सरस्वती, उगारखुर्द यांचे हस्ते कलशारोहण करण्यात आले होते.

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांच्या परिवारातील श्री दत्त संस्था गरुडेश्र्वर, श्री वासुदेव निवास पुणे, श्री रंगावधूत महाराज संस्थान नारेश्र्वर, श्री. नाना महाराज तराणेकर संस्थान इंदौर, श्री नृसिह सरस्वती संस्थान कारंजा, श्री प. पू. सीताराम टेंब्ये स्वामी महाराज संस्थान बडनेरा-झिरी वगैरे सर्व संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. हा सोहळा फार धुमधडाक्यात पार पडला.

सर्वांच्या सहकार्याने हे काम पूर्ण झाले असून या कार्यासाठी रु. ३५ लाख खर्च आला.

Leave a Reply

3 + seven =