महाराजांच्या येणा-या प्रचितीमुळे श्री दत्तमंदिर मध्ये दर्शनासाठी येणा-या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. तसेच श्री दत्तमंदिर मध्ये विविध उत्सव साजरे होत होते. या उत्सवाना येणा-या भक्तांची संख्या देखील पुष्कळ होती. महाराजांच्या ग्रंथाचे पारायण तसेच दर्शनासाठी येणा-या भक्तांना तत्कालिन ५ खोल्यांची इमारत खूपच अपुरी पडत होती. परिणामी भक्तांच्या सोयीच्या दृष्टीने इमारत बांधणे आवश्यक होते.

त्यामुळे मदतीचे आवाहन करुन भक्तनिवास बांधण्यास प्रारंभ करण्यात आला. दोन वर्षात ही इमारत पूर्ण करण्यात आली. या इमारतीसाठी रु. ३० लाख खर्च झाला. या इमारतीमध्ये २१ खोल्या असून प्रत्येक खोलीत ५ ते ६ जण राहू शकतात. स्वच्छतागृहे व स्नानगृहे विपुल प्रमाणात आहेत. प्रत्येक खोलीत पलंग असून अंथरुण पांघरुण उपलब्ध आहे.

सध्या खोलीचे भाडे रु. १०० एका दिवसासाठी आकारले जाते. जपजाप्य, पारायण,धार्मिक कार्यक्रमासांठी व सेवेसाठी , दर्शनासाठीच एक ते तीन दिवसांकरिता खोल्या भक्तांना दिल्या जातात. सप्ताह पारायणासाठी एक आठवडा खोली दिली जाते.

Leave a Reply

3 + fifteen =