संस्थेला वेदपाठशाळा सुरु करायची होती. वेदपाठशाळा विद्यार्थी, गुरुजी, देवस्थान मध्ये कार्यरत असणारे पुजारी, आचारी यांच्या निवास व्यवस्थेसाठी तसेच भक्तांच्या निवासासाठी इमारत बांधणे आवश्यक होते. त्यामुळे ही इमारत बांधण्यास सुरुवात करण्यात आली. सन २०११ मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले. या इमारतीत १५ खोल्या असून प्रत्येक खोलीत आणखी एक खोली आहे. प्रत्येक खोलीत स्नानगृह व स्वच्छतागृह आहे. मुलांना शिकण्यासाठी सुसज्ज हॉल बांधलेला आहे. या इमारतीसाठी ५० लाख रुपये खर्च आलेला आहे.

Leave a Reply

one × 3 =