श्री. प. पू. नांदोडकर स्वामी महाराज हे टेंब्ये स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त होते. महाराजांच्या भक्तीपायी किंबहुना त्यांच्या सानिध्यात राहता यावे यासाठी त्यांनी माणगांवात वास्तव्य केले. त्यांनी महाराजांच्या कार्याचा प्रसार केला. श्री दत्त मंदिरवर सोन्याचा कळस बसविला. महाराजांच्या आज्ञेने सन १९७२ पासून प्रतिवर्षी एक/तीन/सात दिवस यज्ञ ( याग ) करणे सुरु केले. त्यांच्या देहावसनानंतर संस्थेने यज्ञ करणे अजूनपर्यंत सुरु ठेवले आहे.

सध्या दरवर्षी माघ महिन्यात श्री गुरुप्रतिपदा उत्सवाचे वेळी तीन दिवस यज्ञयाग केला जातो. या उत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. हजारो भक्तगण या कार्यक्रमाला येत असतात. तन मन धनाने आपली सेवा अर्पण करत असतात. श्री दत्तमंदिरच्याच बाजूला प. पू. नांदोडकर स्वामी महाराजांचे स्मृतिस्मारक बांधलेले आहे. हल्ली याच मंदिरात नांदोडकर स्वामींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

sixteen + one =