श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ग्रंथसंपदा विपुल आहे. त्याशिवाय महाराजासंदर्भात ब-याच अधिकारी व्यक्तींनी माहिती पुस्तकरुपात प्रसिध्द केलेली आहे. मासिक, त्रैमासिक, वार्षिक अंकामधून महाराज व दत्तस्थानांसंबधी माहिती नेहमी प्रसिध्द होत असते. श्री दत्तमहाराजांच्या कार्याविषयी माहिती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.

श्री दत्त मंदिरमध्ये दर्शनासाठी हजारो भक्तगण येत असतात. जपजाप्य, ग्रंथ पारायण, मनशांती साठी संस्थेच्या भक्तनिवास इमारतीमध्ये बरीच भक्तमंडळी वास्तव्यास असतात. हा विचार करुन तत्कालीन विश्वस्त मंडळाने भक्तांना महाराजांच्या व दत्तमहाराजांच्या लिलांविषयी माहिती व्हावी या उद्देशाने वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला.

माहे मार्च २०११ मध्ये “ श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ग्रंथालय “ या महाराजांच्या नावे ग्रंथालय सुरु करण्यात आलेले आहे. या ग्रंथालयामध्ये महाराजांची सर्व ग्रंथसंपदा, मासिके, त्रैमासिके, इतर दत्तस्थानांसंबधी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंपदा तिथेच बसून वाचावयासाठीच उपलब्ध आहेत.

Leave a Reply

9 − 9 =