श्री. प. प.वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी श्री दत्तमंदिर स्थापन केलेपासून हा औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षाच्या पारावर सर्व भक्तांच्या सोयीसाठी या दत्त पादुका स्थापन केल्या आहेत. या पादुकांवर स्वतंत्र घुमटी बांधून त्यांस प्रतिष्ठापित करण्यात आले आहे.

श्री. प. प.वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी तीन दिवसांत ही विहीर बांधली. श्री दत्तमंदिर स्थापनेपासून ही विहीर आहे. या विहीरीची पुर्नबांधणी देखील कै. अ.सौ. इंदिराराणी होळकर यांनी केली.

लाकडी खांब : श्री. प. प.वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांच्या श्री दत्तमंदिरच्या स्थापनेपासून हे लाकडी खांब मंदिराच्या दोंन्ही बाजूला आहेत.स्वामी महाराज असतांना ज्यांना भूत प्रेत पिशाच्च बाधा असणारे भक्त आरतीला धूप घातला की या खांबांना घट्ट पकडून ठेवत असत. महाराज त्या पिशाच्च बाधितांना उपासना सांगत व त्यायोगे ते पिशाच्च बाधेपासून मुक्त होत असत.

वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांच्या योग चिन्हांकित पादुका : श्री प.प.टेंब्येस्वामी महाराज राजमहेंद्री ( आध्रप्रदेश) या गावी असताना एका भक्ताने श्री प.प.स्वामीना प्रार्थना केली की, आपण मला आपल्या पादुका द्याव्यात. महाराज म्हणाले, “ मी तर अनवाणी प्रवास करीत असतो. मग माझ्या कडे पादुका कुठून असणार ?” पण त्या भक्ताचा भोळाभाव पाहून ते म्हणाले, “ ठीक आहे. एक चांगला दगड घेऊन ये.” तो भक्त छोटी पाथर (पत्थर) दगड घेऊन आला. महाराज त्यावर ५ मिनिट उभे राहिले व खाली उतरले तर काय आश्र्चर्य सध्या जसे आपण स्कॅन करतो त्या प्रमाणे महाराजांच्या तळपांयावरील ठसे जशेच्या तसे त्या दगडावर उमटले. त्या पादुकांची स्थापना राजमहेंद्री ( आंध्रप्रदेश) येथे केली आहे.

कै.अ.सौ.इंदिरा राणी होळकर यांनी माणगांवी श्री दत्तमंदिराचा जीर्णोध्दार केला तेव्हा महाराजांच्या पादुकांची स्थापना करण्याचे ठरविले. तेव्हा एक कारागिर राजमहेंद्री येथे पाठवून त्या पादुका जशाच्या-तश्या कागदावर उमटवून घेऊन त्याप्रमाणे महाराजांच्या तळपायांवर असलेल्या योग चिन्हासह नविन पादुका तय़ार करुन प्रतिष्ठापित केल्या.

Leave a Reply

three × one =