तापत्रयाने मम देह तापला । विश्रांती कोणीं नच देतसे मला ।
दैवे तुझें पद लाधले मला । दत्ता कृपा साऊली दे नमू तुला ।।१।।
कामादि षड्वैरि सदैव ताडिती । दुर्वासना अंग सदैव ताडिती ।
त्राता दुजा कोणी न भेटला । दत्ता कृपा साऊली दे नमू तुला ।।२।।
देही अहंता जडली म मोडवे । गृहादीकस्त्रीममता न सोडवे ।
त्रितापदानावळ पोळितो मला । दत्ता कृपा साऊली दे नमू तुला ।।३।।
अंगी उठे हा अविचार दुर्धर । तो आमुचे हे बुडवितसे घर ।
पापे करोनि जळतो त्वरे मला । दत्ता कृपा साऊली दे नमू तुला ।।४।।
तूची कृपासागर मायबाप तूं । तू विश्वहेतू हरि पापताप तूं ।
न तूज वांचूनि दयाळू पाहिला । दत्ता कृपा साऊली दे नमू तुला ।।५।।
दारिद्र्यादावे द्विज पोळता तया । श्री द्यावया तोडिशी वेल चिन्मया ।
तयापरि पाहि दर्यार्द्र तुं मला । दत्ता कृपा साऊली दे नमू तुला ।।६।।
प्रेतासि तुं वांचविशी दयाघनष । काष्ठासि तूं पल्लव आणिशी मन ।
हे आठवी मी तरि जीव कोमला । दत्ता कृपा साऊली दे नमू तुला ।।७।।
ह्या अष्टके जी स्तवितीं तयावरी । कृपा करीं हात धरी तयां शिरी ।
साष्टांग घालू प्रणिपात हा तूला । दत्ता कृपा साऊली दे नमू तुला ।८।।
इति श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचितं कृपा हस्तं स्तोत्रं संपूर्णम् ।।

Leave a Reply

17 + four =