सांगावे कवणा ठाया जावें ।। कवणांते स्मरावें । कैसे काय करावें, कवण्यापरि मी रहावे ।
कवण येऊनि कुरुंदवाडीं स्वामीते मिळवावे ।।धृ।।
या हारी जेवावे व्यवहारी । बोलावे संसारी । घालुनि अंगिकारी । प्रतिपाळिसी जो निर्धारी ।
केला जो निजनिश्चय स्वामी कोठें तो अवधारी ।। सांगावे.।।
या रानी माझी करुणावाणी ।। काया कष्टी प्राणी ऐकुनि घेशिल कानीं । देशिल सौख्य निधांनीं ।
संकटी होउनि मूर्च्छित असतां पाजिल कवणा पाणी ।। सांगावे.।।
त्या वेळा । सत्पुरुषांचा मेळा । पाहतसे निजडोळां । लाविसी भस्म कपाळा । सांडी भय तूं बाळा ।
श्रीपादश्रीवल्लभ म्हणती अभय तुज गोपाळा ।। सांगावे.।।

Leave a Reply

one × 3 =