कोकणातील माणगाव येथील ही घटना आहे. एका गृहस्थाच्या घरी दुभती गाय होती.ती त्या दिवशी काही केल्या दूध काढू देईना. ती गाय लाथा झाडीत असे. त्या गृहस्थाला कुणी तरी गावातील श्री गणेशभट टेंबे यांच्या मुलाचे नाव सुचविले. त्याचे नाव वासुदेव. वासुदेवाला (श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज) मंत्रांची माहिती होती. गाय दूध दईनाशी झाली होती, तीच्यावर मंत्राप्रयोग करण्यासाठी टेंब्यांच्या वासुदेवाला आमंत्रण देण्यात आले. वासुदेव त्या गृहस्थाच्या घरी उपस्थित झाला आणि त्याने त्या धिंगाणा घालणाऱ्या गायीवर मंत्रप्रयोग केला. मंत्रप्रयोग केल्यानंतर, लाथा झाडणारी ती गाय अगदी शांत झाली होती; मग ती दूध काढू द्यायला तयार झाली.

Leave a Reply

one × 5 =