चातुर्मास १- श्रीक्षेत्र उज्जयिनी मध्यप्रदेश, नदी- क्षिप्रा, इ.स. १८९१, शके १८१३

संन्याशांचा चातुर्मास आषाढ शुध्द १५ ते भाद्रपद शुध्द १५ असा दोन महिन्यांचा असतो. या दोन महिन्यात त्यांनी नदीकिनारी तीर्थक्षेत्रात एकाच ठिकाणी वास्तव्य करावे असा संकेत आहे. संन्यास दिक्षा घेतलेल्या वर्षापासून संन्याशांच्या चातुर्मासांना सुरुवात होते. संन्याशाचे वय त्याचे किती चातुर्मास झाले यावर मोजतात.

श्रीस्वामीमहाराजांनी आपल्या श्रीसद्गुरूंच्या संगतीमध्ये काही दिवस उज्जयिनीमध्ये मुक्काम केला.आषाढ पौर्णिमा जवळ येत होती. श्रीस्वामीमहाराजांनी आपला पहिला चातुर्मास उज्जयिनीलाच करावा असा श्रीस्वामीनारायणानंदसरस्वती स्वामीमहाराजांनी आग्रह धरला. त्यांच्या आग्रहास्तव आपला पहिला चातुर्मास उज्जयिनीलाच करावयाचा असे श्रीस्वामीमहाराजांनी ठरविले.त्यामुळे शके १८१३ अर्थात ई.स.१८९१ चा त्यांचा पहिला चातुर्मास श्रीक्षेत्र उज्जयिनी येथेच झाला. मध्यप्रदेशात. क्षिप्रा नदी काठी. सेन्ट्रल रेल्वे स्टेशन. पाळीचे दत्त मंदिर. बारा ज्योतिर्लिंगापैकी श्री महांकालेश्वर शिव मंदिर स्थान. जवळच हरिसिद्धीचे मंदिरात श्रीस्वामीमहाराजांचा दंडग्रहण विधी झाला.

Leave a Reply

3 × one =