ब्रह्मावर्ताहून निघून गोकुळ, मथुरा, वृंदावन इत्यादि स्थाने पहात पहात महाराज शके १८१५ वैशाख पौर्णिमेच्या सुमारास हरिद्वारास येऊन पोचले. तेथे गंगेच्या तीरावर अहिल्याबाईंच्या धर्मशाळेजवळ असणाऱ्या दत्तमंदिरात महाराजांचा मुक्काम झाला. त्यावेळी तेथे शारदापीठाधीश श्रीराजराजेश्र्वर स्वामी शंकराचार्य यांचाही मुक्काम होता. त्यांच्या आग्रहावरून तेथेच चातुर्मासात राहण्याचे महाराजांनी ठरविले. चातुर्मासांत शंकराचार्यांना उपनिषभ्दाष्य ऐकवून भाद्रपद पौर्णिमेनंतर बद्रिनारायणाचे यात्रेकरिता महाराज निघाले.
श्री क्षेत्र हरिद्वार : उत्तराखंडात. गंगानदीकाठी. रेल्वेस्टेशन. अहल्यादेवी होळकर धर्मशाळेजवळ दत्तमंदिरात महाराजांचा मुक्काम होता. भगवान दत्तात्रय तपःस्थली. कुशावर्त महातिर्थ. कुशाधार महातीर्थ हरिकी पावडी हरिद्वार.

Leave a Reply

one × two =