चातुर्मास ८ – श्रीक्षेत्र तीलकवाडा गुजराथ, नदी- नर्मदा, इ. स. १८९८, शके १८२०

तिलकवाडा येथे मारुतीच्या मंदिरात महाराजांचा चातुर्मास झाला. हे गाव बडोदा संस्थानांतील एक महाल आहे. नोकरीनिमित्ताने आलेले ७-८ दक्षिणी ब्राह्मण व इतर गुजराथी ब्राह्मण वगैरे मंडळींची वस्ती येथे बरी आहे. येथील मंडळी भाविक असल्याने सर्व लोक नित्य महाराजांचे दर्शनास येत असत. पिशाच्च, संततिप्रतिबंध इत्यादिकांवर महाराजांनी उपाय सांगावेत आणि श्रद्धा ठेवून लोकांनी ते उपाय करून सुखी व्हावे असा क्रम सुरू होता. ‘स्वधर्माप्रमाणे वागावे म्हणजे परमेश्र्वर कल्याण करील’ असे त्यांना महाराजांचे नित्य सांगणे असे.

प्रभासक्षेत्राहून निघून महाराज प्राचीसरस्वतीस जाऊन पोचले. या ठिकाणीच येऊन श्रीकृष्ण परमात्मा निजधामास गेले होते. तेथे वंदन करून महाराज पोरबंदर म्हणजे सुदामपुरी या ठिकाणी आले. तेथे काही दिवस वास्तव्य करून नंतर ज्येष्ठ मासांत श्रीक्षेत्र द्वारका या सातव्या मुक्तिपुरीत महाराज येऊन पोचले.

तीलकवाड चातुर्मासात स्वामी महाराजांनी आपल्या प्रवचनात नर्मदाखंडावर पुराण सांगितले शिवाय आन्ध्र लिपीत असलेला कूर्म पूराण हा ग्रंथ देवनागरी लिपीत लिहून काढला. पुढे आश्वीन महिन्यात स्वामी महाराज तिलकवाड वरून वरकाळ जवळ असलेल्या अत्रीमूनींच्या आश्रमात आले तिथे त्यांनी सांगितले अनुसया मातेवर एक स्तुतीपर पद रचले

Leave a Reply

19 − 19 =