श्री देवी यक्षिणी देवीच्या आगमनापूर्वी श्री देवी केळबाई ग्रामदेवता – राजसत्ता तर श्री देवी सातेरी पूर्व सत्ता म्हणून गावांत कार्यरत होती. श्री देवी केळबाईच्या पाट हा श्री देवी यक्षिणी मंदिरात आहे. तर मंदिर तळीवाडी येथे आहे. श्री देवी सातेरी ही ग्रामदेवता होती.श्री यक्षिणी देवीच्या आगमनानंतर गावची रहाटी श्री देवी यक्षिणी देवीच्या कृपाआशीर्वादाने चालू झाली. मूळ भूमिका म्हणून श्री देवी सातेरीकडे बघितले जाते. तिची पूजा अर्चा आराधना केली जाते.
