श्री वासुदेव शास्त्री यांनी वयाच्या २१ व्या वर्षी केवळ गुरुजी चीं आज्ञा म्हणून मुलगी न बघता लग्नाला होकार दिला व पायाने अधु असलेली. कै बाबाजी पंत गोडे,नारुर यांची मुलगी बयो सौ. अन्नपूर्णा झाली. त्या पत्यनुसरिणी, सुशील व शांत होत्या. त्यांची देखील समाधी अवस्थेपर्थंत साधना होती. देवाज्ञेने माणगांव सोडून जाताना वासुदेव शास्त्री बरोबर सौ.अन्नपूर्णा माता गरोदर असताना ही वासुदेव शास्त्री श्री दत्त महाराजांच्या आज्ञेने माणगांव सोडून जाताना त्याही त्यांच्या सोबत निघाल्या. नरसोबावाडीस मृत पुत्र जन्मानंतर त्यांचे संसार चे पाश कमी झाले. गंगाखेड (परभणी ) येथे कॉलराच्या साथीन त्या खुपच आजारी पडल्या. वासुदेव शास्त्री ने त्यांची सेवा केली. पण यश आले नाही. सौ.अन्नपूर्णा बाईंनी स्वामी महाराजांना आपले मुळ स्वरुप दाखवा अशी विनंती केली. मुळ स्वरुपाच्या दर्शनानंतर आपल्या पतिच्या म्हणजेच श्री वासुदेव शास्त्रीच्यां पायावर डोके ठेवून त्यांचा आत्मा वैशाख शु.१४ शके …. दिनी दत्तस्वरुप झाला.
गंगाखेड , जि.परभणी येथे त्यांची समाधी आहे. २३ .मे २००९ साली या समाधी चे मेघडंबरीत रुपांतर केले. त्यावेळी तिथल्या एका शिलेच्या (दगडाच्या) पादुका तयार करुन त्या सौ.अन्नपूर्णा मातेच्या घरी म्हणजेच माणगांवी श्री टेंब्ये स्वामी च्या जन्मस्थानी आणून स्वामी महाराजांच्या शेजारी त्या प्रतिष्ठापित केल्या आहेत. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांचे जन्मस्थान श्री दत्त मंदिरच्या समोरच २०० मीटर अंतरावर आहे.

Leave a Reply

13 − 4 =