श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज या गुहेत बसून ध्यानधारणा करीत असत. याच गुहेत श्री दत्तमहाराजांनी त्यांना दर्शन दिलेले होते. ही गुहा दत्तमंदिरच्या नैऋत्य दिशेस डोंगरात असून तेथे जाण्यासाठी पायी जावे लागते. जाण्या येण्यासाठी किमान अर्धा तास लागतो. वयस्कर व्यक्तींना जास्त वेळ लागतो. जाताना पूर्ण चढण लागते. येताना पूर्ण उतरता रस्ता आहे. डोंगराळ भागात असल्याने सावधगिरी बाळगावी लागते. सध्या रेलींगची व्यवस्था केलेली आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी, मनशांतीसाठी हे ठिकाण उपयुक्त आहे.

डोंगराळ भागात असल्याने येथे जाण्यासाठी फक्त पायवाटच आहे. त्यामुळे कायमस्वरुपी रस्ता वा पाय-या बांधल्यास भक्तांची सोय होऊ शकेल. हा संकल्प विश्वस्त मंडळाचे विचाराधीन आहे.

Leave a Reply

thirteen + eight =