महाराजांच्या प्रचितीमुळे श्री दत्त मंदिर मध्ये दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी येणा-या भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वार्षिक कार्यक्रमांसाठी येणा-या भक्तांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. तत्कालिन भोजनाचा हॉल अपुरा पडत असल्याने नवीन हॉल बांधणे आवश्यक होते. त्यामुळे ही इमारत बांधण्यास सुरुवात सन २००४ रोजी करण्यात आली. पाच वर्षे पूर्ण व्हायला लागली.
खालच्या हॉलमध्ये पाचशे माणसे जेवायला बसू शकतील. वरच्या हॉलमध्ये माणसे एक हजार जेवायला बसू शकतील. याच इमारतीत तळमजल्यावर सुसज्ज कार्यालय, अन्नदान हॉल आहे. वरच्या मजल्यावर विश्वस्त कार्यालय, मौजीबंधन शांतीसाठी हॉल आहे. स्नानगृहे, स्वच्छतागृहे, राहण्यासाठी खोल्या आहेत.
महाराजांच्या सौभाग्यवतींचे नाव अन्नपूर्णा असल्याने या इमारतीला अन्नपूर्णा भवन असे नाव देण्यात आले आहे.